esakal | 'जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री वड्डेटीवारांवर गुन्हा दाखल करा'
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Wadettiwar

मराठा आरक्षणाचा बोजवारा न्यायालयाच्या निर्णयाने उडाला आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोषाची भावना आहे.

'जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री वड्डेटीवारांवर गुन्हा दाखल करा'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : वारंवार बेताल वक्तव्ये करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे (Karad Taluka Maratha Kranti Morcha) पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील (Dr. Ranjit Patil) यांना देण्यात आले.

निवेदनातील माहिती अशी, मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) बोजवारा न्यायालयाच्या निर्णयाने उडाला आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोषाची भावना आहे. याची पूर्ण माहिती मंत्री वडेट्टीवार यांना आहे, तरीही समाजातील मराठा आणि आरक्षण नसणाऱ्या लोकांच्या भावना दुखावणे सुरूच आहे. मंत्री वडेट्टीवार हे मंत्रिमंडळात समाविष्ट आहेत, तरीही हेतुपूर्वक वागत असल्याने कायद्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल होणे जरुरी आहे. मंत्री वडेट्टीवार हे मराठा समाजाविरुद्ध हेतुपूर्वकपणे जाहीर आणि माध्यमापुढे बेताल वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करत आहेत.

हेही वाचा: जुलमी मोदी सरकार खोटी स्वप्नं दाखवून सत्तेत; नाना पटोलेंचा घणाघात

सोलापूरच्या ओबीसी मेळाव्यात मंत्री वडेट्टीवार यांनी दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांना उद्देशून भडकावू वक्तव्य करून उपस्थित समुदायाला चिथावणी दिली. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांची जनतेतील प्रतिमा मलिन करून बदनामी केली जात आहे. त्याबद्दल मंत्री वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

loading image
go to top