Shiv Sena Expands Base in Satara: मंत्री देसाई, ‘‘पाटण तालुक्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याने जनतेला आता विकासाबाबत वस्तुस्थिती समजली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात झालेली आणि सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची माझ्याकडून दिलेली पोच आहे.
ढेबेवाडी : विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाटण तालुक्यातील राजकीय परिस्थितीत खूप मोठा बदल झाला आहे. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात सुरू असलेले ‘इनकमिंग’ म्हणजे जनतेकडून मिळत असलेली विकासाची पोच आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.