कास - कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात पर्यटकांना पहिल्यांदाच दुर्मिळ अजगर आढळून आला. हा महाकाय अजगर इंडियन रॉक पायथॉन प्रजातीचा (भारतीय अजगर) असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले..पर्यटकांनी जलाशयात पोहताना या अजगराचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा अजगर लगतच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधून वासोट्याच्या दिशेने मुनावळे परिसरात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पामुळे अलीकडे मुनावळे परिसर पर्यटकांचे नंदनवन म्हणून उदयास येत आहे. नुकताच याठिकाणी नौकाविहाराचा आनंद घेत असताना पर्यटकांना हा अजगर आढळून आला. मात्र, वासोटा किल्ल्याच्या समोरच अजगर आढळल्याने पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे. काही सर्पमित्रांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली..यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी अजगराला सुरक्षित रेस्क्यू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. इंडियन रॉक प्रजातीचा हा अजगर जंगलातून जलाशयाकडे कसा पोहोचला याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे..वन्यजीव वैभव अधोरेखितइंडियन रॉक पायथॉन (भारतीय अजगर) ही संरक्षित वन्यजीव प्रजाती आहे. हे साप बिनविषारी असतात आणि भक्ष्याला विळखा घालून मारतात. याची लांबी साधारणतः साडेनऊ ते दहा फूट असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी सह्याद्रीच्या जंगलातील वन्यजीव वैभव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे..जलाशयात किंवा जंगलात अशा प्रकारचे वन्यजीव आढळल्यास करमणूक म्हणून वा उत्सुकतेने त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. वन्य जीवाला त्याच्या असुरक्षेची जाणिव झाल्यास हल्लाही होवू शकतो. त्यातून जीवितासही धोका पोचण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे तत्काळ वनविभागाला कल्पना देवून जागरुकता दाखवावी.- सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.