Satara News: 'कऱ्हाडात किराणा दुकानाला भीषण आग'; साहित्य जळून खाक, २० लाखांचे नुकसान, दोन तासानंतर आग आटोक्यात
Massive Fire at Grocery Shop in Karad: विजय दिवस चौक परिसरात समीर खान यांचे यादगार ट्रेडर्स हे किराणामालाचे दुकान होते. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास दुकानातील साहित्याला अचानक आग लागली.
Grocery store in Karad engulfed in flames; fire brigade operations continue to douse the fire.Sakal
कऱ्हाड : येथील विजय दिवस चौक परिसरातील एका किराणामालाच्या दुकानाला काल रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.