मराठा आरक्षणप्रश्नी त्वरित निर्णय घ्या, राजे प्रतिष्ठानचा सरकारला इशारा

गजानन गिरी
Sunday, 18 October 2020

जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल होत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती व नोकरभरतीतील आरक्षण कायम ठेवावे. यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा, अशी मागणी राजे प्रतिष्ठानने केली आहे.

मसूर (जि. सातारा) : मराठा आरक्षण स्थगिती रद्द करून आरक्षण सुरू करा, अन्यथा राजे प्रतिष्ठान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा राजे प्रतिष्ठान कऱ्हाड उत्तरच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. तहसीलदारांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी सांगितले. 

जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल होत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती व नोकरभरतीतील आरक्षण कायम ठेवावे. यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करावे आणि आरक्षण स्थगिती उठवण्याचा प्रयत्न करावा. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास राजे प्रतिष्ठान रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Masur Raje Pratishthans Agitation For Maratha Reservation Satara News