
-मुकुंद भट
ओगलेवाडी: मध्य रेल्वे विभागातील कोल्हापूर- पुणे लोहमार्गावरील स्वातंत्र्यपूर्व काळातील सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचे कऱ्हाड महत्त्वाचे स्थानक आहे. तेथील जुन्या मालवाहतूक धक्क्याचे अमृतस्थानक योजनेत नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. माल धक्क्याचा विस्तार व उंची वाढवल्याने माथाडी कामगारांना मालवाहतूक सोयीचे व सुलभ झाले आहे. तथापि, त्यांच्या अन्य समस्या अद्याप कायम व दुर्लक्षितच आहेत.