
लोणंद : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे उद्या (गुरुवार) दुपारी दीड वाजता जिल्ह्यातील पाडेगाव (ता. खंडाळा) येथे आगमन होत आहे. त्यावेळी पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.