esakal | राजकीय आकसातून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न; नगराध्यक्षांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Dahiwadi Municipality

राजकीय आकसातून आम्ही केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा हा केविलवाणा खटाटोप आहे, असा टोला नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी हाणला.

राजकीय आकसातून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : राजकीय आकसातून आम्ही केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा हा केविलवाणा खटाटोप आहे, असा टोला नगराध्यक्ष धनाजी जाधव (Mayor Dhanaji Jadhav) यांनी हाणला. स्वीकृत नगरसेवक महेंद्र जाधव (Corporator Mahendra Jadhav) यांनी विविध मागण्यांसाठी कालपासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष जाधव बोलत होते. श्री. जाधव म्हणाले, ‘भटकी मळा हायमास्ट पोलचे काम निविदा प्रक्रियेत आहे. तीन आठवड्यांत हायमास पोल बसविले जाणार आहेत. खालचा रानमळा रस्त्याचे काम मंजूर झाले असून, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतून (PM Rural Road Scheme) ते काम होणार आहे. त्यासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. (Mayor Dhanaji Jadhav Criticizes Corporator Mahendra Jadhav Over Development Works In Dahiwadi bam92)

नगरोत्थानमधून २७ जानेवारी २०२१ रोजी भटकी मळा रस्ता मुरमीकरण करणे व झाडे काढणे या कामाची तांत्रिक मान्यता झाली आहे. कोरोनामुळे निधीची कपात झाल्याने ते काम प्रलंबित राहिले. निधी उपलब्ध झाला, की प्राधान्यक्रमाने ते काम करणार आहोत. शेतकऱ्यांची संमती नसल्याने वरचा रानमळा, ढगे वस्ती येथील रस्ता नगरपंचायतीकडे वर्ग नसल्याने तिथे निधी खर्ची टाकता येत नाही. तेथील शेतकऱ्यांनी तीन मीटर रस्त्यासाठी संमती देऊन मागणी केल्यास ते रस्तेही करण्यात येतील.’

हेही वाचा: Corona Impact : साताऱ्यात सोमवारपासून Lockdown शिथिल

जाधव म्हणाले, ‘उपोषणकर्ते स्वीकृत नगरसेवक महेंद्र जाधव हे ११ पैकी सहा बैठकांना गैरहजर आहेत. त्यामुळे त्यांना नगरपंचायतीमध्ये काय काम सुरू आहे, याची माहिती नाही. त्यामुळे त्यांचे उपोषण हे अपुऱ्या माहितीवर राजकीय श्रेय घेण्यासाठी करत आहेत. विविध कामे मार्गी लावली आहेत.’ दरम्यान, आज सकाळी अकरा वाजल्यापासून नगरसेवक महेंद्र जाधव यांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणास सुरुवात केली. मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी जाधव यांना मागण्यांबाबत लिखित स्वरूपात माहिती देऊन उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करणारे पत्र त्यांना दिले आहे.

Mayor Dhanaji Jadhav Criticizes Corporator Mahendra Jadhav Over Development Works In Dahiwadi bam92

loading image