esakal | 'नाबार्ड'कडून जिल्हा बॅंकेचा बेस्ट परफॉर्मर पुरस्काराने सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

Satara District Bank

जिल्हा बॅंकांच्या देशाच्या कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामधील महत्वपूर्ण योगदानासाठी नाबार्ड आपल्या ४० व्या स्थापनादिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सातारा जिल्हा बॅंकेला पुरस्काराने सन्मानित केले आहे.

'नाबार्ड'कडून जिल्हा बॅंकेचा बेस्ट परफॉर्मर पुरस्काराने सन्मान

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक नाबार्ड (National Bank for Agriculture and Rural Development NABARD) यांच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दलचा बेस्ट परफॉर्मन्स बॅंक पुरस्कार (Best Performance Bank Award) यावर्षी सातारा जिल्हा बॅंकेला (Satara District Bank) सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे ऑनलाईन वितरण केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर (Agriculture Minister Narendrasingh Tomar) यांच्या हस्ते बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale), उपाध्यक्ष सुनील माने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना देण्यात आला. यावेळी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम उपस्थित होते. (NABARD Announces Best Performer Award To Satara District Bank Satara Marathi News)

जिल्हा बॅंकांच्या देशाच्या कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामधील महत्वपूर्ण योगदानासाठी नाबार्ड आपल्या ४० व्या स्थापनादिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सातारा जिल्हा बॅंकेला पुरस्काराने सन्मानित केले आहे. या करिता प्रामुख्याने शेतीसाठी कर्जपुरवठ्यामधील सहभाग, वंचित घटकाना बॅंकिंग प्रवाहात समाविष्ट करणे, महिला सक्षमीकरण, तंत्रज्ञानाचा अवलंब, बॅंकंची आर्क्षिक प्रगती, कर्ज वितरण व वसुलीमधील सातत्य, उत्कृषठ नफा या निकषांवर हापुरस्कार दिला आहे. या निकषाच्या आधारे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सातत्याने बॅंकिंग व नॉन बॅंकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. बॅंकेने शेतकरी सभासदांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने तसेच ३० लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज शुन्य टक्के व्याजदाराने उपलब्ध करुन दिले आहे.

हेही वाचा: 'कृष्णा'च्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसलेंची बिनविरोध निवड

बॅंक पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या संस्थांना अकरा वर्षांपासून दर वर्षी २६ ते २९ हजार रुपयांप्रमाणे आजपर्यंत दोन कोटी ८३ लाख वसुली प्रोत्साहन निधी दिला आहे. संस्था पातळीवर शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थांना १५ हजार गौरव निधी उपलब्ध केला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या सहकाऱ्यांमुळे देशातील सर्वांधिक ९७ टक्के कर्ज वसुली झाली आहे. बॅंकेने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन शेतकरी मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी योजना राबवली आहे. या योजनेसाठी बॅंकेने आपल्या उत्पन्नातून १२ कोटीपर्यंत रुपये विमा हप्ता भरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी १६ लाख, एक कोटीचे जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध केले आहे. जिल्हा बॅंकेनच्या सर्वंकष प्रगती आणि बांधिलकी जपत दिलेले योगदान यामुळेच बॅंकेस यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावेळी संचालक सुरेखा पाटील, कांचन साळुंखे, प्रकाश बडेकर, शिवरुपराजे खर्डेकर, राजेश पाटील वाठारकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: छत्रपतींच्या गादीला डावलण्याचा भाजपचा प्रयत्न

जरंडेश्वर कारखान्याला केलेल्या कर्ज पुरवठ्यावरुन बॅंकेला नोटीस आलेली नसुन ईडीने कर्जाची माहिती मागविली आहे. त्यामुळे बॅंकेच्या कोणत्याही धोरणास बाधा येणार नाही. इतर कारखान्यांप्रमाणे जरंडेश्वरला योग्य तारण घेऊनच बॅंकेने कर्ज पुरवठा केलेला आहे. त्यामुळे बॅंक पूर्णपणे सुरक्षित आहे, असे बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

NABARD Announces Best Performer Award To Satara District Bank Satara Marathi News

loading image