
मेढा : शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा घेतल्याच्या घटनांमुळे अनेकांच्या चिंतेत वाढ होत आहे. दरम्यान, आज बाजारपेठेत एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल १२ जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे, तर पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे समोर आले आहे. जखमींवर मेढा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.