esakal | दोरीने गळफास लावून बैलाची क्रूरपणे हत्या; वाईतील एकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Medha Police

शर्यतीच्या बैलाला सरताळे गावाशेजारील कॅनॉलजवळ आणून संशयिताने दोरीच्या साहाय्याने गळफास लावून त्याची हत्या केली, तसेच क्रूरपणे बैलाचा पाय आणि शेपटीही तोडली होती.

दोरीने गळफास लावून बैलाची क्रूरपणे हत्या; वाईतील एकाला अटक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मेढा (सातारा) : सरताळे (ता. जावळी) येथे मागच्या आठवड्यात बैलाची (Bull) गळफास लावून, तसेच शेपटी व पाय तोडून हत्या करण्यात आली होती. हत्या केलेल्या बैलाला कुडाळ पाचवड रस्त्यालगत (Kudal-Pachwad Road) असणाऱ्या कॅनॉलजवळ टाकण्यात आले होते. याप्रकरणी कुमार प्रकाश पडवळ (रा. कुंभारवाडी, ता. वाई) याला मेढा पोलिसांनी (Medha Police) अटक केले आहे. (Medha Police Arrested One Man From Wai Taluka Satara Crime News)

मेढा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शर्यतीच्या बैलाला सरताळे गावाशेजारील कॅनॉलजवळ आणून संशयिताने दोरीच्या साहाय्याने गळफास लावून त्याची हत्या केली, तसेच क्रूरपणे बैलाचा पाय आणि शेपटीही तोडली होती. मेढा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत कुमार पडवळ याला जीपसह (एमएच ११ सीएच २३२९) ताब्यात घेतले. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात आणखी संशयित असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: ‘जरंडेश्‍वर’वर ‘ईडी’ला पाय ठेवू देणार नाही; आमदार शिंदेंचा इशारा

या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Superintendent of Police Ajay Kumar Bansal) यांच्या सूचनेखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील व पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, पोलिस उपनिरीक्षक विकास शिंदे, पोलिस हवालदार नितीन जाधव, संजय ओव्हाळ, अमोल पवार, इम्रान मेटकरी, सनी कांबळे, पद्मसेन घोरपडे, अभिजित वाघमळे, चालक जितेंद्र कांबळे यांनी केला.

Medha Police Arrested One Man From Wai Taluka Satara Crime News

loading image