esakal | विनापरवाना रेमडेसिव्हिर दिल्यास मेडिकलचा परवाना होणार रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir

विनापरवाना रेमडेसिव्हिर दिल्यास मेडिकलचा परवाना होणार रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : विनापरवानगी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची परस्पर विक्री व वितरण करण्यात येऊ नये, अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध साथरोथ रोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत निष्काळजीपणाबद्दल हॉस्पिटल व मेडिकल परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्णसंख्येचा विचार करता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची टंचाई भासत आहे. रुग्णालयांत या इंजेक्‍शनची मागणी दैनंदिन वाढत आहे, असे नमूद करून जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ""भविष्यातील वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्‍शनचा साठा व मागणी विचारात घेता विविध पातळीवर उपाययोजनेसह तरतूद करणे अत्यंत आवश्‍यकता आहे.

..तर जिल्ह्यांतर्गत फिरताच येणार नाही; शासनाकडून E-pass सक्तीचा!

जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर व जिल्हा कोरोना हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल्स आणि होलसेल व रिटेल मेडिकल वितरक- डिस्ट्रिब्युटर्स यांनी त्यांना प्राप्त झालेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या साठ्याची अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या वितरण आदेशानुसारच विक्री व वितरण करावे.'' विनापरवानगी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची परस्पर विक्री व वितरण करण्यात येऊ नये. अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध साथरोथ रोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदांतर्गत निष्काळजीपणाबद्दल हॉस्पिटल व मेडिकल परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

loading image