esakal | कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : आमदार पाटील

बोलून बातमी शोधा

Makrand Patil

कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : आमदार पाटील

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (सातारा) : शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (ता. 27) पासून संपूर्ण शहरात जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली.

कोरोना उपाययोजनांच्या आढाव्यासाठी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत पालिका सभागृहात बैठक झाली. या वेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव आदी उपस्थित होते. शहरात सूक्ष्म लक्षणे असलेले, उपचारानंतर घरी सोडलेले बाधित रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. त्यातील काही रुग्ण बाहेर फिरत असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात 42 प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आल्याचे प्रांताधिकारी चौगुले यांनी सांगितले. मात्र, त्याची कडक अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

खासदार, माजी मुख्यमंत्री, राज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच 'व्हेंटिलेटर'ची वाणवा; रुग्णांचा जीव टांगणीला

त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याची सूचना आमदार पाटील यांनी केली. मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांचा समन्वय ठेवावा. सर्व नगरसेवक, नगरसेविकांच्या मदतीने व सहकार्याने कोरोना संसर्गाच्या उपाययोजना करताना शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना त्रास होणार नाही, असे नियोजन करावे. घरपोच साहित्य मिळण्याची व्यवस्था उभारण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

Edited By : Balkrishna Madhale