esakal | खासदार, माजी मुख्यमंत्री, राज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच 'व्हेंटिलेटर'ची वाणवा; रुग्णांचा जीव टांगणीला

बोलून बातमी शोधा

Ventilator Bed
खासदार, माजी मुख्यमंत्री, राज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच 'व्हेंटिलेटर'ची वाणवा; रुग्णांचा जीव टांगणीला
sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ (सातारा) : खासदार, माजी मुख्यमंत्री, राज्यमंत्र्यांचा पाटण तालुका असतानाही कोरोनाच्या कठीण काळातही तालुक्‍यात एकही व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था नाही. तीन कोविड रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालय, 13 प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन डझनभर खासगी हॉस्पिटल असताना एकही व्हेंटिलेटर बेड नाही. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा फैलाव सुरू आहे. दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. बेड, ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे. सध्या, शासकीयसह खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. पाटण तालुक्‍याची लोखसंख्या तीन लाख 68 हजार 396 इतकी आहे. सध्या तालुक्‍यात दोन ग्रामीण रुग्णालये, 13 प्राथमिक आरोग्य केंद्र, 63 आरोग्य उपकेंद्र, पाटण, नवारस्ता, मल्हारपेठ, ढेबेवाडी, तळमावले, तारळे या मोठ्या बाजारपेठांमध्ये अंदाजे दोन डझनभर खासगी रुग्णालये आहेत.

Google ने कोरोना वाॅरियर्सला खास अंदाजात म्हटले Thank You

मात्र, या एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटरचा बेड नाही, ही शोकांतिका आहे. वर्षभरापासून व्हेंटिलेटर बेडअभावी रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरसाठी तालुक्‍यातील रुग्णांना कऱ्हाड, सातारा, पुणे, कोल्हापूरला उपचारासाठी हलवावे लागते. पाटण तालुका हा खासदार, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, सध्याच्या गृह राज्यमंत्र्यांचा तालुका असतानाही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही, हे विशेषच आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णांना चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

संकट काळातून बाहेर पडण्यासाठी कऱ्हाडातील 300 युवकांचे याेगदान

पाटण तालुक्‍यात नेत्यांनी एखादे तरी व्हेंटिलेटर बेडचे हॉस्पिटल सुरू करावे. व्हेंटिलेटरअभावी काहींचे प्राण गेलेत. यापुढील काळात निदान दक्षता घ्यावी.

-हर्षद देसाई, ग्रामस्थ, ठोमसे

Edited By : Balkrishna Madhale