esakal | ED कारवाईप्रकरणी आमदार शिंदेंचा आजपासून खटाव, कोरेगावात मेळावा
sakal

बोलून बातमी शोधा

Jarandeshwar Sugar Factory

ईडीला शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला लावण्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन केल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.

ED कारवाईप्रकरणी आमदार शिंदेंचा आजपासून खटाव, कोरेगावात मेळावा

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) कोणत्याही परिस्थितीत सुरू राहिला पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी आज (सोमवार) खटाव तालुक्यात, तर मंगळवारी (ता. २०) कोरेगाव तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी (Sugarcane Growers In Koregaon Taluka), कारखान्याचे कामगार, ऊस तोडणी वाहतूकदारांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आयोजित केला आहे. (Meeting Of MLA Shashikant Shinde On Jarandeshwar Factory Case From Today At Khatav And Koregaon bam92)

कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू राहिलाच पाहिजे, ही भूमिका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी व ईडीला (ED action on Jarandeshwar sugar factory) शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला लावण्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन केल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली. वडूज (सातेवाडी फाटा) येथील मधुमाला मंगल कार्यालयात आज दुपारी एकला, तर पुसेगावातील सेवागिरी मंगल कार्यालयात दुपारी चारला मेळावा होणार आहे.

हेही वाचा: प्रतापगड सुरू न झाल्यास टाळे तोडू; आमदार शिंदेंचा गर्भित इशारा

या मेळाव्यात कारखान्याविषयी सद्य:स्थितीची माहिती दिली जाणार आहे. यावेळी खटाव आणि माण तालुक्यांतील प्रमुख संस्थांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी (ता. २०) सकाळी दहाला देऊर येथे, दुपारी एकला भाडळे येथे, तीनला चिमणगाव येथे, तर सायंकाळी पाचला एकंबे येथे मेळावा आयोजित केला आहे. जरंडेश्वर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Meeting Of MLA Shashikant Shinde On Jarandeshwar Factory Case From Today At Khatav And Koregaon bam92

loading image