esakal | आता विनाकारण फिरल्यास 14 दिवस क्वारंटाइन; कोरोना चाचणीही होणार
sakal

बोलून बातमी शोधा

quarantine

नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या कडक अंमलबजावणीसाठी शहरात नऊ ठिकाणी तपासणी नाके केले आहेत.

आता विनाकारण फिरल्यास 14 दिवस क्वारंटाइन; कोरोना चाचणीही होणार

sakal_logo
By
राजेंद्र ननावरेे

मलकापूर (सातारा) : नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या (Collector Order) कडक अंमलबजावणीसाठी शहरात नऊ ठिकाणी तपासणी नाके केले आहेत. शहरातील दाट वस्ती असणाऱ्या भागातील सर्व रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून, त्यांना 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे, असा निर्णय सर्व प्रभाग अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. (Meeting Regarding Coronavirus At Malkapur Satara Marathi News)

नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नगरसेविका आनंदी शिंदे, प्रशांत चांदे, नूरजहॉं मुल्ला, आनंदी शिंदे, राजेंद्र यादव, कमल कुराडे, शकुंतला शिंगण, नगरसेवक सागर जाधव, अजित थोरात, आनंदराव सुतार, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, "कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता रुग्णांची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक जूनपर्यंत कडक लॉकडाउन (Strict lockdown) केला आहे. वैद्यकीय कारण आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी आहे. शहरातील नऊ ठिकाणी तपासणी नाके करण्यात आले आहेत. पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील दाट वस्ती असणाऱ्या भागातील सर्व रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून, त्यांना 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येईल.''

जनता तुम्हांला माफ करणार नाही; सेना 'महाविकास'मध्येच विसरु नका

Meeting Regarding Coronavirus At Malkapur Satara Marathi News