
म्हसवड : पळशी (ता. माण) येथे दोघांना मारहाण करत त्यामधील एकावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पाच जणांना म्हसवड येथील कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश राजीव बी. बहिरवाल यांनी तीन वर्षे तुरुंगवास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हणमंत मनोहर टाकळे (वय २९), विलास बाबा करे (वय ४३), बजरंग मनोहर टाकळे (वय २४), पोपट संभाजी टकले (वय ४१) व मनोहर संभाजी टकले (वय ५०, (सर्व रा. पळशी) अशी नावे आहेत.