
म्हसवड : येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी देवस्थानची रथ मिरवणूक यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यात्रेच्या उपाययोजनांची माहिती घेतली. रथोत्सव सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारी पार पडाव्यात. कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.