

Shocking Incident in Sastewadi: Man Murdered During Midnight Field Visit
Sakal
फलटण: सस्तेवाडी (ता. फलटण) येथे फलटण रस्त्यावर लोंढे वस्तीनजीक मारहाण करून एकाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी चार तासांमध्ये दोघांना अटक केली आहे. गणेश बाळू मदने (वय ४०, रा. सस्तेवाडी) असे मृताचे नाव असून, रोहन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, फलटण) आणि गणेश शंकर जाधव (वय २२, सध्या रा. सोमवार पेठ, फलटण मूळ रा. कलिना, कुंचीकोरवी गल्ली नं. सात, विद्यानगरी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.