पावसाने झालेल्या नुकसानीचे जागेवर जाऊन पंचनामे करा; पालकमंत्र्यांचे 'महसूल'ला आदेश

महाबळेश्वर तालुका हा जंगलमय असल्याने काम करण्यास अडचणी येत आहेत.
Minister Balasaheb Patil
Minister Balasaheb Patilesakal

भिलार (सातारा) : पाचगणी शहरात वादळी पावसाने (Heavy Rain) झालेल्या नुकसानीचे जागेवर जाऊन पंचनामे करावेत, असे आदेश आज महसूल विभागाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी दिले. पाचगणी परिसरात वादळी वारे आणि पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आज पालकमंत्री पाटील यांनी केली. या वेळी त्यांनी हे आदेश दिले. (Minister Balasaheb Patil Inspected The Crop Damage In Mahabaleshwar Taluka Satara News)

या प्रसंगी आमदार मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, सभापती संजूबाबा गायकवाड, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, बेल एअरचे संचालक फादर टॉमी, तालुका आरोग्य अधिकारी अजित कदम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, प्रवीण भिलारे, जतिन जोश, महावितरणचे अधीक्षक अभियंता गायकवाड, वीज वितरणाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, किरण पवार आदी उपस्थित होते. त्यानंतर बेल एअर येथे झालेल्या बैठकीत वीज वितरणच्या व नुकसानीचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. या वेळी महावितरणच्या पाचगणी येथील कार्यालयात रिक्त पदाबाबत आढावा घेतला. या वेळी रिक्त असणारी पदे तातडीने भरा, असेही सांगितले.

महाबळेश्वर तालुका हा जंगलमय असल्याने काम करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्मचारी भरावेत, असे आमदार पाटील यांनी सुचवले. प्रतापगड आणि कोयना विभागात अद्यापही पूर्ण दाबाने वीज नसल्याने मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. संजूबाबा गायकवाड यांनी यावर माहिती देऊन या ठिकाणी पूर्ण दाबाच्या वीजपुरवठ्यासाठी उपाययोजना करण्याचे सांगितले. बाळासाहेब भिलारे यांनी पाचगणी व महाबळेश्वर शहर आणि पाचगणी ते महाबळेश्वरपर्यंत असणारी वीज वहिनी अंडरग्राऊंड करावी, असे सुचवले. पाचगणी शहर व ग्रामीण भागातील वीज कामगार वाढवून तो तातडीने सुरळीत करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. या वेळी पालकमंत्री पाटील यांनी पाचगणी आरोग्य केंद्र, श्रीनिवास बोधे यांचे घर, तलाठी कार्यालय येथे झाडे पडून झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

VIDEO पाहा : तौक्ते चक्रीवादळाची महाबळेश्वरला धडक; मुसळधार पावसात घरं, शाळांची पडझड

Minister Balasaheb Patil Inspected The Crop Damage In Mahabaleshwar Taluka Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com