अंतवडीत जलसंधारण तलावाचे काम युद्धपातळीवर; तालुक्यातील 385 एकर क्षेत्राला होणार 'लाभ' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

अंतवडीत जलसंधारण तलावाचे काम युद्धपातळीवर; तालुक्यातील 385 एकर क्षेत्राला होणार 'लाभ'

मसूर (सातारा) : अंतवडी येथील साठवण तलावाच्या कामाची पाहणी सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. मंत्री पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हा तलाव मंजूर झाला आहे. जलसंधारण विभागामार्फत त्याचे बांधकाम सुरू आहे.

मंत्री पाटील यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, "सह्याद्री'चे संचालक माणिकराव पाटील, कोपर्डे हवेलीचे सरपंच नेताजी चव्हाण, अंतवडीचे सरपंच युवराज शिंदे, सुरेश शिंदे, संभाजी शिंदे, बापूराव शिंदे, सचिन शिंदे, राजेंद्र शिंदे, अभियंता श्रीकांत आढाव, कनिष्ठ अभियंता वृषाली वाघमारे, ठेकेदार विजय देसाई, ग्रामस्थ उपस्थित होते. तलावाचे बांधकाम उत्कृष्ट करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केल्या.

अधिकाऱ्यांनो, माणुसकीच्या नात्याने लक्ष द्या; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर आमदार गोरेंची नाराजी

मसूरचा पूर्व भाग दुष्काळी पट्ट्यामध्ये येतो. या परिसरामध्ये शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, अशी येथील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. आघाडी शासनाच्या काळात या तलावाला मंजुरी मिळवून 2014 मध्ये या तलावाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. जलसंधारण तलावाचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तलावामध्ये साठवल्या जाणाऱ्या पाण्यामुळे अंतवडी येथील 385 एकर क्षेत्र ओलिताखाली येईल. परिसरातील बोअर व विहिरींना पाण्याचा उद्भव वाढून शेती बागायती होईल.

Edited By : Balkrishna Madhale

टॅग्स :SataraAntwadi