आता कोरोनामुक्त गावांना मिळणार तब्बल 50 लाख

Minister Balasaheb Patil
Minister Balasaheb Patilesakal

सातारा : राज्याच्या ग्रामीण भागातील (Rural areas) कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, तसेच महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने (State government) 'कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना' (Coronafree Village Award Scheme) सुरू केली आहे. या योजनेत ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) सहभाग नोंदवून आपले गाव कारोनामुक्त करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी केले आहे. (Minister Balasaheb Patil Said The First Corona Free Village Can Get 50 Lakh Rupees Satara Marathi News)

Summary

महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने 'कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना' सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवाहन केले. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. सुभाष चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

Minister Balasaheb Patil
पहिला परदेशात जाणाऱ्यांना लस द्या; खासदार पाटलांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना

या योजनेंतर्गत प्रत्येक महसुली विभागात (Revenue Department) पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय त्यांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत-जास्त ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग नोंदवावा. तसेच विविध गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. या कक्षांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी भेटी द्याव्यात, यासाठी एक वेळापत्रक तयार करावे. गृह विलगीकरण बंद करण्यात आले असून जास्तीत-जास्त रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व रिलायन्स फाऊंडेशन्सच्या वतीने 25 ऑक्सिजन काँन्सट्रेशन मशिन्स देण्यात आल्या आहेत. या मशीन्स पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आरोग्य विभागाला सुपूर्द करण्यात आल्या.

Minister Balasaheb Patil Said The First Corona Free Village Can Get 50 Lakh Rupees Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com