esakal | निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका ठरणार 'निर्णायक'; देसाईंना पुन्हा बिनविरोधची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Balasaheb Patil

या मतदारसंघात सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यात आहेत.

निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका ठरणार 'निर्णायक'

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून मजूर औद्योगिक, विणकर व मजूर संस्था मतदारसंघाकडे पाहिले जाते. आजपर्यंत सर्वाधिक काळ (कै.) विलासराव पाटील- उंडाळकरांचे समर्थक अण्णा कुंडलिक सावंत यांनी २४ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले; पण अपक्ष निवडणूक लढून अनिल देसाई यांनी त्यांचा पराभव केला. त्या वेळपासून तब्बल १५ वर्षे ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत असल्याने येथील नेत्यांशी असलेली श्री. देसाई यांची जवळीक पाहता त्यांना पुन्हा बिनविरोधची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) या मतदारसंघाबाबत नेमकी काय भूमिका घेणार यावर या मतदारसंघातील गणिते अवलंबून राहणार आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्वात सोपा आणि सुरक्षित मतदारसंघ म्हणून औद्योगिक, विणकर आणि मजूर संस्था मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघाच्या स्थापनेनंतर (कै.) विलासराव पाटील- उंडाळकरांचे समर्थक अण्णा कुंडलिक सावंत हे या मतदारसंघातून पहिल्यांदा संचालक झाले. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात सर्जेराव झांजुर्णे (तडवळे संमत कोरेगाव, ता. कोरेगाव) हे एक वर्षाच्या कालावधीत संचालक झाले. त्यांच्या निधनानंतर पुन्हा अण्णा कुंडलिक सावंत पुन्हा संचालक झाले. ते तब्बल २४ वर्षे संचालक राहिले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी विलासकाका उंडाळकरांच्या विरोधात पॅनेल टाकले होते. त्या वेळी अपक्ष लढून माण तालुक्यातील अनिल देसाई यांनी श्री. सावंत यांचा पराभव केला. त्यानंतर सलग १५ वर्षे तेच या मतदारसंघातून संचालक आहेत.

हेही वाचा: मठावरील 'ते' किस्से आम्हाला जनतेपुढे सांगावे लागतील

या मतदारसंघात सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यात आहेत. यावेळेस सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवडणुकीत लक्ष घातलेले आहे. त्यामुळे ते या मतदारसंघातून अन्य कोणाला संधी देणार का, यावर सर्व काही अवलंबून आहे; पण अनिल देसाई यांची विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, बॅंकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी असलेली जवळीक पाहता त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे; पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील याबाबत काय भूमिका घेणार यावर या मतदारसंघातील गणिते अवलंबून राहणार आहे. अद्यापतरी श्री. देसाई वगळता उर्वरित कोणाचेही नाव इच्छुकांमध्ये पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

आजपर्यंत संचालक...

  • कुंडलिक अण्णा सावंत

  • सर्जेराव झांजुर्णे

  • अनिल देसाई

loading image
go to top