
कुडाळ ; प्रतिपंढरपूर करहर (ता. जावळी) येथील आषाढी यात्रा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. संबंधित विभागांनी कामांचे योग्य नियोजन करून कामे प्राधान्याने व मुदतीत पूर्ण करावीत. दर्शनास येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. भाविक, ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करून यात्रा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.