
कऱ्हाड: हिंदू दहशतवादी कधीही असू शकत नाही, हे न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसून देशाचे नेते आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला. कऱ्हाडला दौऱ्यावर आले असता मंत्री गोरेंनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.