
Minister Makarand Patil’s efforts secure ₹40 crore for underground electricity in Wai, Khandala, and Mahabaleshwar; tenders soon.
Sakal
सातारा: वाई-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील भूमिगत वीजवाहिनी टाकण्याच्या कामांना १५ व्या वित्त आयोगातून ३९.८३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबत मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.