कऱ्हाड - मराठी-हिंदी भाषा वादावर सरकारने काही करायची गरज नाही. समाजच त्याचे उत्तर देईल. मराठी ही मातृभाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेला आहे. त्यानंतरही कोणी जातीवरून समाजाला डिबेट करत असेल तर ते यशस्वी होणार नाहीत, असा खोचक टोला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधुना नाव न घेता लगावला.