Agitation | मंत्री मलिकांच्या प्रतिमेस फासले काळे; भाजपचे पोवई नाक्यावर आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation

मंत्री मलिकांच्या प्रतिमेस फासले काळे; भाजपचे पोवई नाक्यावर आंदोलन

सातारा - मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेले आरोपी व अतिरेक्यांशी संबंध असल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तातडीने राजीनामा द्यावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी आदी मागण्या करत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील पोवई नाक्यावर नवाब मलिक यांच्या फोटोला काळे फासले.

नवाब मलिक यांच्या निषेधार्थ भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मलिक यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून काळे फासले. यावेळी भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, ॲड. प्रशांत खामकर, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले ,जयदीप ठुसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश नलावडे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, नितीन कदम, तालुका उपाध्यक्ष विक्रम पवार, चिटणीस रवी आपटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विक्रम बोराटे, जिल्हा उपाध्यक्ष किरण गोगावले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुजित साबळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा रीना भणगे, सुनिशा शहा, कुंजा खंदारे, अश्विनी हुबळीकर, वनिता पवार, किशोर पंडित उपस्थित होते.

loading image
go to top