
कऱ्हाड : वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील जोतिबा देवस्थानसह परिसरातील संबंधित गावांचा समावेश असलेल्या स्वतंत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर श्री जोतिबा मंदिर आणि संपूर्ण परिसराचा विकास केला जाईल. श्री जोतिबा मंदिर व परिसराचा विकास हा स्थानिकांना विश्वासात घेऊनच केला जाईल, अशी ग्वाही पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.