esakal | शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध : गृह राज्यमंत्री देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध : गृह राज्यमंत्री देसाई

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शिवारात डोळ्यादेखत वाया गेलेल्या पिकांची माहिती मंत्री देसाई यांना देताना शिवारातच सोयाबीनला अंकुर फुटले आहेत. ज्वारीच्या कणसातील दाणे काळे पडले आहेत. काढणीस आलेले भात पीक आणि ऊस भुईसपाट झाले आहेत, अशी कैफीयत मांडली.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध : गृह राज्यमंत्री देसाई

sakal_logo
By
अनिल बाबर

तांबवे (जि. सातारा) : पावसाने नुकसान झालेल्या पीक नुकसानीचे अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे दिले. 

पावसाने नुकसान झालेल्या साजूर व साकुर्डी येथील भात, सोयाबीन, मका पिकांची पाहणी मंत्री देसाई यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. त्यानंतर ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडल अधिकारी पंडित पाटील, मंडल कृषी अधिकारी सुशांत भोसले, कृषी पर्यवेक्षक अशोक कोळेकर, हणमंतराव चव्हाण, साजूरचे सरपंच संदीप पाटील यांच्यासह तांबवे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

जिगरबाज महाराष्ट्र पाेलिसांची हरियाणात धडाकेबाज कामगिरी 

या वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शिवारात डोळ्यादेखत वाया गेलेल्या पिकांची माहिती मंत्री देसाई यांना देताना शिवारातच सोयाबीनला अंकुर फुटले आहेत. ज्वारीच्या कणसातील दाणे काळे पडले आहेत. काढणीस आलेले भात पीक आणि ऊस भुईसपाट झाले आहेत, अशा कैफीयत मांडली. त्यानंतर मंत्री देसाई म्हणाले, "अस्मानी संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी खंबीर आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडीच सरकार संकट काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून जास्तीत-जास्त मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top