esakal | लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करा; गृहराज्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai
लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करा; गृहराज्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
sakal_logo
By
इम्रान शेख

रहिमतपूर (सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका व आरोग्य यंत्रणेकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा घेत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन काही सूचना या वेळी देसाई यांनी दिल्या.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाधितांचा आकडा चिंतेचा विषय असून, या परिस्थितीत शासनाने लॉकडाउनसंदर्भात घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. शहरात कोठेही गर्दी होत कामा नये. अत्यावश्‍यक कारणांशिवाय कोणीही बाहेर पडू नये, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. शहराच्या परिस्थितीबाबत त्यांनी नगराध्यक्ष आनंदा कोरे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, पोलिस निरीक्षक गणेश कड व आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला.

सातारकरांनाे! 50 वयाेगटाच्या पुढील नागरिकांना कवाटळले मृत्यूने

प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या लसीकरणांची संख्या व उपलब्ध लशींची संख्या याबाबत त्यांनी माहिती घेतली. पन्नास टक्के लसीचा पुरवठा होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून या वेळी देण्यात आली. या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, नगराध्यक्ष आनंदा कोरे, सह्याद्री कारखान्याचे संचालक अविनाश माने, सतीश भोसले, वासुदेव माने, सचिन कुंभार, विक्रम माने, राजू शिंदे आदी उपस्थित होते.

'सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्‌सची सेवा करावयाची आहे'

Edited By : Balkrishna Madhale