esakal | 'सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्‌सची सेवा करावयाची आहे'
sakal

बोलून बातमी शोधा

Bandatatya Karadkar

'सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्‌सची सेवा करावयाची आहे'

sakal_logo
By
विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : गेले वर्षभर कोरोनाचा खेळ खेळणारे सरकार आता कोरोना लस घेण्यासाठी परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून देशवासियांना फसवून लुटत आहे. कोरोनाची कल्पना बिल गेट्‌सच्या डोक्‍यांतून निर्माण झाली असून, भारतासह अनेक देश बिल गेट्‌सची खेळणी आहेत. हे जगातील अनेक तज्ज्ञ ओरडून सांगत आहेत, तरीही लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकणे सुरू आहे. त्यामुळे कोरोना हा विषाणू नसून दहशत असल्याचे वादग्रस्त विधान हभप बंडातात्या कऱ्हाडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.

ते म्हणाले, ""देशात दर वर्षी कॅन्सरने मरणाऱ्यांची संख्या सरकारी माहितीनुसार साडेसात ते आठ लाख आहे. दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या अडीच लाख आहे. असे असताना फक्त बनावट कोरोनाने मरणाऱ्या रुग्णांची संख्या वाढवून सांगितली जाते. तंबाखू, तंबाखूजन्य व अन्य मादक पदार्थांचे उत्पादन, विक्री व सेवनावर कोणतेही बंधन नाही.

यावरून सरकार दांभिक आहे, हे सिद्ध होते. कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप, थंडी, सर्दी, कफ, खोकला अशी सामान्य असून, तो जीवघेणा रोग नाही. त्यावर आयुर्वेदात शेकडो उपाय आहेत; पण सरकार त्या उपायांना प्राधान्य देत नाही. कारण ही औषधे बिल गेट्‌सची नाहीत. सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्‌सची सेवा करावयाची आहे.''

व्वा रे सरकार! 'राज्य तुमच्या बापाची जहागिरी आहे काय'

अभिमानास्पद! शिवरायांच्या भुमीतील 'प्रियांका'ची दमदार कामगिरी