Koyna
Koynaesakal

विनाशकारी भूकंपानंतर कोयना विभाग दुसऱ्यांदा 'शापित'

कोयनानगर (सातारा) : विनाशकारी कोयना भूकंपानंतर (Koyna Earthquake) ५४ वर्षांनी कणखर असणारा सह्याद्री २२ जुलैला कोयना खोऱ्यात झालेल्या भूस्खलनामुळे गर्भगळीत झाला. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी परिश्रमपूर्वक वसवलेली कोयनेची दौलत त्यात उघडी पडली आहे. ५४ वर्षानंतर ही घडी बसवण्याची जबाबदारी लोकनेत्यांचा वारसा चालवणारे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांच्यावर आली आहे.

Summary

साडेसहा दशकांपासून कोयनापुत्रांच्या पाचवीलाच संघर्ष पूजला आहे.

साडेसहा दशकापासून कोयनापुत्रांच्या पाचवीलाच संघर्ष पूजला आहे. धरणग्रस्त, भूकंपग्रस्त, अभयारण्यग्रस्त असणारे कोयनापुत्र २२ जुलैला दरडग्रस्त झाले आहेत. 65 वर्ष झाले तरी राज्याच्या कोयना पुत्रांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. तर 25 वर्षापासून अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नाची यात भर पडली आहे. कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न सध्या तरी मृगजळच ठरले आहेत. कोयना विभागातील जनतेने या अस्मानी सुलतानी संकटाला ज्या धीराने तोंड दिले. विनाशकारी कोयना भूकंपाच्या रौद्रभीषण संहारानंतर ५४ वर्षांनी कोयनेत पुन्हा रौद्र भीषण संहार निसर्गाच्या अवकृपेमुळेच झाला आहे.

Koyna
'रामाची गोष्ट' सांगताना BJP आमदाराची झाली 'चूक'

२२ जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे कोयना विभाग दुसऱ्यांदा शापित झाला आहे. कोयना भूकंपात काम करणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू गृहराज्यमंत्री देसाई यांची काम करण्याची पध्दत त्यांच्याप्रमाणेच आहे. आपत्तीग्रस्त असलेल्या चार गावाबरोबर शापित झालेल्या कोयना विभागाचे नंदनवन पुन्हा स्थापित करण्याचे काम गृहराज्यमंत्री देसाई व महाविकास सरकारला करावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com