
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत विकसित भारताचा अमृत काळ या संकल्पनेंतर्गत उत्तम सेवा, सुशासन आणि सर्वसामान्य लोकांचे कल्याण असा भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा पारदर्शी कारभार केला आहे. केंद्रातील सरकारने अकरा वर्षे पूर्ण केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला जागतिक स्तरावर नवीन उंची देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने नुकतेच जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकाची महासत्ता होण्याचे उद्दिष्ट गाठले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.