
कास : जोडीने धावण्याच्या अनोख्या संकल्पनेमुळे जावळी जोडी रनची वेगळी ओळख निर्माण झाली असून, या स्पर्धेमुळे जावळीचे नाव देशपातळीवर गेले आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. जावळी जोडी रनच्या पोस्टर्सचे अनावरण नुकतेच त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.