
-हेमंत पवार
कऱ्हाड: शहर व परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षांचा चांगला वापर होत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत शाळा, महाविद्यालये सुरू व्हायला लागल्यावर कॉलेज परिसरात हिरोगिरी करण्यासाठी रिक्षा भाड्याने घेऊन चालवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. अनेक अल्पवयीन मुलेही अशा रिक्षा चालवत आहेत. त्यामुळे आरटीओ आणि पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे.