बेपत्ता पोलिस निरीक्षक Sangram Tate बेशुध्द अवस्थेत सापडले

Police Inspector Sangram Tate
Police Inspector Sangram Tateesakal
Updated on
Summary

जालना एसीबीत ते कर्तव्य बजावत असताना ताटेंना 20 दिवसांपूर्वीच प्रमोशन मिळालं होतं.

खंडाळा : जालना (Jalna) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बेपत्ता असलेले पोलिस निरीक्षक संग्राम ताटे Police Inspector Sangram Tate (मूळ रा. मारुल, ता. कराड, सातारा) हे अखेर 13 दिवसानंतर बेशुध्द अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरु आहेत. शिरवळ येथे ताटे सापडले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.

जालना एसीबीत ते कर्तव्य बजावत असताना संग्राम ताटे यांना 20 दिवसांपूर्वीच प्रमोशन मिळालं आहे. त्यानुसार त्यांची कोकणात बदली झाली होती. याच दरम्यान दि. ३ फेब्रुवारी रोजी ते जालना येथील घरात मोबाईल, वाहन, पाकीट, घड्याळ अशा वस्तू ठेवून घरातून बाहेर पडले होते. बराचवेळ झाल्यानंतर संग्राम ताटे हे परत न आल्याने त्यांच्या पत्नीनं शोधाशोध केली. परंतु, संग्राम ताटे यांचा ठावठिकाणा लागला नाही.

Police Inspector Sangram Tate
नवा भारत 'शरियत'नुसार नव्हे, तर संविधानानुसार चालेल : CM योगी

गेल्या चार दिवसांपूर्वी ते सांगली शहरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची पराकाष्टा केली. मात्र, यात त्यांना यश आलं नाही. रविवारी (दि. १३) रोजी दुपारी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एक जण बेशुध्द अवस्थेत पडलेल्याचे परिसरातील एका व्यक्तीला दिसले. त्या व्यक्तीने संग्राम ताटे याच्या हातावर मोबाईल नंबर लिहिल्याचे निदर्शनास आले. या क्रमांकावर व्यक्तीने फोन केल्यावर संग्राम याच्या पत्नीने तो उचलला. संग्राम यांचे वर्णन सागताच तिने ओळखले. यानंतर पत्नीनं तात्काळ याची माहिती कऱ्हाड येथील कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक संग्राम ताटे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com