
गोंदवले : गणपती उत्सवासाठी गावी निघालेले गुहागर (जि. रत्नागिरी) येथील शिक्षक कुटुंब अचानक बेपत्ता झाले असल्याची चर्चा होती. मात्र, तब्बल ४० तासांनंतर गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात सुखरूप सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे.