
उंडाळे : विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचा प्रतिनिधी निवडून न आल्याची खंत आहे. स्थानिक राजकारणाच्या हेवेदावे व एकमेकांच्या राजकीय कुरघोडीत विरोधकांना फायदा झाला. त्यामुळेच सातारा जिल्हा पुरोगामी विचाराला मुकल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.