VIDEO पाहा : 'आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा भुजबळांनी सत्तेतून बाहेर पडावं'

MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goreesakal

सातारा : ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द करण्यास राज्य सरकारच (Maharashtra Government) जबाबदार असून केवळ महाराष्ट्रातच आरक्षण रद्द झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) येत्या २६ जूनला राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. जिल्ह्यातही भाजपचे आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन होणार आहे, अशी माहिती भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांनी दिली. सत्तेत असलेले समता परिषदेचे नेते छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हानही त्यांनी केले आहे. (MLA Jaykumar Gore Criticizes Minister Chhagan Bhujbal Over OBC Political Reservation Satara Political News)

Summary

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे याला हे सरकारच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी केला.

आमदार गोरे यांनी शासकीय विश्रामगृहात आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे याला हे सरकारच सर्वस्वी जबाबदार असून टेक्निकल डाटा देऊ शकलेले नाही. आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या सरकारला जाग आणण्यासाठी व तातडीने कार्यवाही करावी, यासाठी २६ तारखेला चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर एक हजार ठिकाणी आंदोलन होणार आहे. राज्य शासन ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देण्याची कार्यवाही करण्यापेक्षा सरकारमधील काही मंत्री आंदोलन करत आहेत. कायदेशीर प्रक्रिया पार न पडता समाजासमोर जाऊन आंदोलनाची नाटक करत आहेत.

MLA Jaykumar Gore
आज तुम्हाला सूर्यास्त उशीरानं पहावयास मिळेल; जाणून घ्या कारण

वडेट्टीवार साहेबांनी (Minister Vijay Wadettiwar) सरकारला आरक्षण देण्यास भाग न पडता सरकारमधील काही मंत्री रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. सरकारमधील छगन भुजबळ मंत्री आहेत. ते समता परिषदेचे नेतेही आहेत. राजकीय आरक्षण हे देशातील गेलेले नाही, महाराष्ट्रातील गेले आहे. त्यामुळे आरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्राची असून ते सरकामध्ये असल्याने भुजबळांचीही देखील आहे. रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची नौटंकी ते करत आहेत. समाजाचा वापर सत्तेसाठी करताना समाजासाठी काही मिळत नाही. त्यातही सरकार त्यांचं ऐकत नाही. त्यांच्यावर आंदोलनाची वेळ का येत आहे. त्यांचा सरकारवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे व आंदोलनाची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केली.

MLA Jaykumar Gore
अतिवृष्टीचे पंचनामे तीन दिवसांत करा; गृहराज्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

या सरकारला जाग आणणयासाठी २६ जूनला आम्ही ओबीसी आरक्षणाचा विषय घेऊन आम्ही लढा उभारला आहे. त्याच पध्दतीने मराठा आरक्ष्णाबाबत ही हाच घोळ केला आहे. त्यांनी कोर्टात व्यवस्थित भूमिका मांडली नाही. टेक्निकल गोष्टी होत्या त्या समोर आणल्या नाहीत. गायकवाड आयोगाच्या अहवालाचे भाषांतर यांना करता आलेले नाही. सरकार व्यवस्थित भूमिका मांडत नसल्याची भूमिका कोर्टानेही मांडलीआहे. पदोन्नतसाठी असलेली आरक्षणे मिळत नाहीत. हा प्रश्न हे सरकार व्यवस्थित हाताळत नाही. एकुणच सरकार उदासीनता असल्याने आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. जो पर्यंत ओबीसींचे आरक्षण पुन्हा देत नाहीत, पदोन्नतीचे आरक्षण पुरस्थापित करत नाही. तोपर्यंत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ देणार नाही. भाजपच्यावतीने देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहोत.

MLA Jaykumar Gore
ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात; 'समता परिषदे'ची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

कोरोनाच्या बैठकांना आम्हाला बोलावलं जात नाही

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात जिल्हा प्रशासन व पालकमंत्री कमी पडले असे वाटते का?, या प्रश्नावर आमदार गोरे म्हणाले, जिल्ह्यात १४ महिन्यांपासून कोरोनाची साथ आहे. ही सर्व मंडळी कुठे गेली होती. जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी ते कोणाचेही एकत नाहीत. पालकमंत्री कुठे आहेत, त्यांना शोधावे लागते. त्यांची जबाबदारी नाही का? कोरोनाच्या बैठकांना आम्हाला बोलावले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MLA Jaykumar Gore Criticizes Minister Chhagan Bhujbal Over OBC Political Reservation Satara Political News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com