
कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत. भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार देशातील एमएसपी व्यवस्था पहिल्याप्रमाणेच चालू राहील आणि काही धान्याची आधारभूत किंमत वाढवण्यात आली आहे. विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करता येणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.
बिजवडी (जि. सातारा) : कॉंग्रेससह राज्यातील विरोधकांना शेतकऱ्यांच्या भल्याचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांना शेतकऱ्यांची नव्हे तर मध्यस्थांची भरभराट हवी आहे. त्यामुळेच विरोधक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणाऱ्या केंद्राच्या महत्त्वपूर्ण कृषी सुधारणा विधेयकाला विरोध करत असल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
बोराटवाडी (ता. माण) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी भाजपचे माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, "कॉंग्रेस सुरुवातीपासून देशातील शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली अनेक बंधनांमध्ये अडकवून ठेवत आली आहे. कॉंग्रेसने देशातील शेतकऱ्यांच्या हिताला जपणारा कोणताही निर्णय घेतला नाही. मोदी सरकार शेतीविषयी कायद्यामध्ये सुधारणा करून भारतीय कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणून बळिराजाची परिस्थिती सुधारण्यासाठी कार्यरत आहे, तेव्हा कॉंग्रेस देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.
राज्य सरकारने धनगर-धनगड असा भेद चालवलाय : फलटण धनगर समन्वय समितीचा आरोप
कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत. भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार देशातील एमएसपी व्यवस्था पहिल्याप्रमाणेच चालू राहील आणि काही धान्याची आधारभूत किंमत वाढवण्यात आली आहे. विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करता येणार आहे. कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे