'मविआ'वर टीका करताना शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली; शिंदे म्हणाले, शरद पवार म्हणजे अंगठा.. I Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi Mahesh Shinde Sharad Pawar

करंगळी हे बोट कशासाठी वापरतात, हे सर्वांना ठाऊक आहे. ती करंगळी म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आहेत.'

Satara : 'मविआ'वर टीका करताना शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली; शिंदे म्हणाले, शरद पवार म्हणजे अंगठा..

सातारा : आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ ही वज्रमूठ नाही तर ‘....’ अशा अश्‍लाघ्य शब्दांत केलेल्या टीकेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या वक्तव्याची राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या उत्सवानिमित्त साताऱ्यातील पोवई नाक्यावर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर महेश शिंदे यांनी दुचाकी रॅली काढली होती. रॅलीवरून परत जाताना त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

या वेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर खालच्या शब्दात टीका केली. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीविषयी विचारले असता आमदार महेश शिंदे म्हणाले, 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे हाताचा अंगठा आहेत. करंगळी हे बोट कशासाठी वापरतात, हे सर्वांना ठाऊक आहे. ती करंगळी म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आहेत.'

'शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे म्हणजे हाताचे मधले बोट आहे. तिसरे बोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असून, चौथे बोट हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. पवारांनी कोणाला कसा अंगठा दाखवला, हे आजपर्यंत कोणाला कळाले नाही.'

राऊतांची वक्तव्ये म्हणजे खंडीच्या वरणात लघुशंका केल्याचा प्रकार आहे. तिसऱ्या व चौथ्या बोटाने मधल्या बोटाला इतकेच चेपवले आहे, की बोलायची सोय नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ नसून ती ‘...….’ आहे. जनता या महाविकास आघाडीला स्वीकारेल, असे अजिबात वाटत नाही, असं शिंदेंनी म्हटलंय.