esakal | शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढविणार; आमदार पाटलांनी जाहीर केली भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Makarand Patil

चंगळवादामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा भुईंज येथील किसन वीर कारखाना अडचणीत आला आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढविणार

sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (सातारा) : चंगळवादामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा भुईंज येथील किसन वीर कारखाना (Kisan Veer Sugar Factory) अडचणीत आला आहे. पण, शेतकऱ्यांच्या हिताकरिता व किसन वीर आबांच्या नावाचा कारखाना वाचविण्याकरिता कारखान्याची निवडणूक (Factory Election) लढवण्यात येणार आहे, असे सुतोवाच वाईचे आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनी केले. शिरवळ (ता. खंडाळा) येथील न्यू कॉलनी सत्यज्योत तरुण मंडळाच्या समाज मंदिराचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले होते.

आमदार पाटील पुढे म्हणाले, किसन वीर आबांच्या नावाने साखर कारखाना सुरु आहे. त्यांच्या नावाचा कारखाना बंद पडू नये ही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर आमचीही धारणा आहे. चंगळवादामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा भुईंज येथील किसन वीर कारखाना हा अडचणीत आला आहे. राज्य शासनाने शेतकरी बांधव अडचणीत येऊ नये, याकरिता कारखाना सुरु करण्यासाठी ३० कोटी रुपये भागभांडवल दिले म्हणून, गेल्यावर्षी उशीराने का होईना, किसन वीर कारखाना सुरु होऊ शकला. यापूर्वी किसन वीर कारखान्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दोन वेळा सखोल चर्चा झाली होती. किसनवीर साखर कारखान्याची संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे.

हेही वाचा: NCP च्या आमदार शिंदेंना चुकांच्या परिमार्जनाची संधी

त्यांनी याबाबत अभ्यास करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना वाचविण्याकरिता काय करता येईल, याचा अभ्यास करून सांगतो असे सांगितलेय. याबाबत पुढील आठवड्यामध्ये पुन्हा त्यांच्यासोबत बैठक झाल्यावरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलेय. याप्रसंगी खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, आदेश भापकर, दिलीप गुंजवटे, विकास तांबे, सचिन राऊत, रिजवाना काझी, आशा कारळे, प्रकाश परखंदे, चंद्रकांत मगर, समीर काझी, बाळासाहेब जाधव, ताहेर काझी आदी उपस्थित होते. अजय चौगुले यांनी प्रास्ताविक, तर मोहन कासुर्डेंनी आभार मानले.

loading image
go to top