
कुंभमेळ्याला सूट दिल्यानेच कोरोनाचा उद्रेक; पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारवर घणाघात
मलकापूर (जि. सातारा) : देशात कुठल्याच राज्याने पॅकेज दिले नाही. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना व राज्याची तिजोरी रिकामी असताना केवळ सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 5400 कोटी रूपयांचे पॅकेज दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सरकारच्या या निर्णयावरती भाजपा नेते टीका करत असल्याने त्यांचा तोकडेपणा व दळभद्रीपणा लोकांसमोर आला असल्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
येथे कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी मलकापूर पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व कोविड-19 या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, युवा नेते उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, इंद्रजीत चव्हाण, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, धनाजी काटकर, निवास थोरात, नगरसेवक सागर जाधव, आनंदराव सुतार, जयंत कुराडे, नगरसेविका गीतांजली पाटील, स्वाती तुपे, आनंदी शिंदे, पूजा चव्हाण, नंदा भोसले, विद्याताई थोरवडे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांची उपस्थिती होती.
श्री. चव्हाण म्हणाले, प्रत्येक देशाने कोविडपासून अब्जावधी करोड रुपयांची पॅकेज जाहीर केले. कर्ज काढली, नोटा छापल्या मात्र मोदी सरकारने गेल्या लॉकडाऊनमध्ये धान्य वाटपाच्या रुपाने तुटपुंजी मदत केली होती. ज्यांचे हातावरचे पोट आहे. त्यांना थेट मदत व्हावी अशी आमची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी होती. राज्य सरकारने ती मागणी मान्य करत थेट मदतीचे पॅकेज दिल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कुंभमेळा सारख्या मोठ्या धार्मिक उत्सवाला सूट दिल्याने तिथे कोरोनाची परिस्थिती उद्भवली आहे. अशा उत्सवांना परवानगी देणे निषेधार्ह आहे. त्याला उत्तर प्रदेश व केंद्र सरकार संपूर्णपणे जबाबदार आहे. देशात 96000 कोरणार गुणांचा उच्चांक होता. तो काल एक लाख 84 हजार म्हणजे दुपटीने वाढ झाली आहे.
अशा प्रकारच्या बेजबाबदार पणाच्या वागणुकीची अपेक्षा नव्हती. रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्याअधिकारी राहुल मर्ढेकर ते पृथ्वीराज चव्हाण यांचे चालक व यांनीही रक्तदान करत युवकांसमोर आदर्श ठेवला. रक्तदान करण्यासाठी शहरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पालिका पदाधिकाऱ्यांसह शहर व कराड दक्षिण मधील युवकांनी यावेळी रक्तदान केले. यशवंत ब्लड बँकेचे डॉ. संदीप यादव यांच्यासह त्यांचा सहकाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
Web Title: Mla Prithviraj Chavan Criticism Kumbh Mela Celebrations Uttar Pradesh Satara News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..