आरोग्य केंद्रांना लागेल ती मदत करणार; आमदार शिंदेंची कोरेगावात ग्वाही

एकही रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, अशी सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on: 

कोरेगाव (सातारा) : येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्‍यातील सर्व सात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी आवश्‍यक असलेले साहित्य माझ्या स्वतःच्या आमदार फंडातून उपलब्ध करून देणार आहे. परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले असल्याने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना शासकीय कोरोना केअर सेंटर्समध्ये सेवा देण्यासंदर्भातील आदेश प्रांताधिकाऱ्यांनी आजच काढावेत आणि कोरेगावमधील खासगी रुग्णालयातील बेड्‌स अधिग्रहण करावेत. याकामी काही अडचण आल्यास संबंधितांशी मी स्वत: चर्चा करेन. मात्र, एकही रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आरोग्य विभागासह प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे केली.

पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती सुनील साळुंखे, माजी सभापती संजय झंवर, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, सहायक गटविकास अधिकारी सुनील भस्मे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. राजन काळोखे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कोरोनासह आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणीही राजकारण करता कामा नये, असे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, ""रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे उपाययोजना राबवण्यासाठी ग्रामसमित्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घ्यावे. उपजिल्हा रुग्णालय परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आरटीपीसीआर व रॅट टेस्ट करण्याची व्यवस्था करावी. कोरेगाव येथील चॅलेंज ऍकॅडमी येथे शंभर बेड व ग्रामीण रुग्णालयामध्ये 99 ऑक्‍सिजन बेड लवकरच सुरू केले जाणार आहेत.

नगरपंचायतीने कोरोना सेंटर सुरू करावे

कोरेगाव शहरातील रुग्णसंख्येचा चढता आलेख लक्षात घेऊन नगरपंचायतीकडे निधीची तरतूद असल्यास शहरासाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर सुरू करावे, त्यासाठी स्थानिक पातळीवरील विविध घटकांचे निश्‍चितपणे सहकार्य मिळेल, असे आमदार शिंदे यांनी या वेळी सुचवले. त्यावर मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी चौदाव्या वित्त आयोगातून दहा लाखांपर्यंतचा निधी कोरोनासाठी वापरता येऊ शकेल, त्यावरील खर्चासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले आणि नगरपंचायतीमार्फत निश्‍चितपणे स्वतंत्र कोरोना केअर सेंटर सुरू केले जाईल, असेही मुख्याधिकारी घाडगे यांनी सांगितले.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
why Tapoḷa Ahir bridge is closed for traffic
Satara 17-year-old girl death case
Marathi News Esakal
www.esakal.com