नुकसानग्रस्तांचे त्वरित पंचनामे करा : आमदार शिंदे

केशव कचरे
Wednesday, 21 October 2020

मोळ येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सोयाबीन, घेवडा, तूर पिकांच्या झालेल्या नुकसानीची आमदार शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे संबंधित विभागाने तत्काळ पूर्ण करावेत. त्याबाबातचा सकारात्मक अहवाल शासनाला सादर करावा. शासनाकडून जास्तीतजास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन आमदार शिंदे यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांना दिले.

बुध (जि. सातारा) : मोळ, मांजरवाडी, गारवडीसह डिस्कळ परिसरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले. 

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे उत्तर खटाव परिसरातील घरे, नद्या नाल्यावरील पूल व शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची आमदार शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता कचरे, मार्केट समितीचे संचालक राजेंद्र कचरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संजय चव्हाण, प्रदीप गोडसे, सरपंच डॉ. महेश पवार, बाळासाहेब इंगळे, श्‍याम कर्णे, अधिकारी व मोळ, मांजरवाडी येथील शेतकरी उपस्थित होते. 

नाद खुळा! वन्यप्राणी, पक्ष्यांना पळवून लावणारी तोफ

मोळ येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सोयाबीन, घेवडा, तूर पिकांच्या झालेल्या नुकसानीची आमदार शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे संबंधित विभागाने तत्काळ पूर्ण करावेत. त्याबाबातचा सकारात्मक अहवाल शासनाला सादर करावा. शासनाकडून जास्तीतजास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन आमदार शिंदे यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांना दिले. पाहणी दौऱ्यात त्यांनी गारवडी व नेर येथील वाहून गेलेल्या पुलांची पाहणी करून पुलांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना वडूज बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. कळंत्रे यांना दिल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Shinde Visited The Field And Inspected The Crop Damage Caused By Heavy Rains At Mol Satara News