esakal | बुके घेईन तर फक्त शिवेंद्रराजेंकडूनच…; जयंत पाटलांच्या भेटीने चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shivendrasinharaje Bhosale)

सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची महाविकास आघाडीतील नेत्यांशी जवळीक पाहता, राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

बुके घेईन तर फक्त शिवेंद्रराजेंकडूनच…; जयंत पाटलांच्या भेटीने चर्चांना उधाण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांची महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांशी जवळीक पाहता, राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज जलसंपदामंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) हे साताऱ्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला District Central Bank भेट दिली. दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाने जेव्हा जयंत पाटील यांचा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ आणला, त्यावेळी मंत्री पाटील यांनी मी फक्त शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडूनच बुके घेणार’ असं म्हटल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले. (MLA Shivendrasinharaje Bhosale Met On Minister Jayant Patil At Satara District Bank bam92)

गेल्या काही दिवसांपासून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नेहमीच संपर्कात असताना दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती आणि पवारांनीही त्यांना सातारा मेडिकल काॅलेजसाठी भरघोस निधी दिल्याने ही भेट वारंवार होत राहिली, त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भाजप सोडणार का?, असा असाल देखील यानिमित्ताने उपस्थित झाला होता. मात्र, आज जलसंपदामंत्र्यांनीच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत हजेरी लावल्याने या भेटीचे नेमके कारण काय? अशीही चर्चा रंगू लागलीय.

सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे यांचे राजकीय वजन मोठे मानले जाते. विधान सभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची साताऱ्यातील पावसाची सभा चांगलीच गाजली होती. या सभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणच बदलून गेली. परंतु, ती सभा ज्या सातारा शहरात झाली, त्या सातारा-जावळी मतदार संघात मात्र, भाजपमध्ये असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता आणि या मतदार संघात राष्ट्रवादीच्या दीपक पवारांचा पराभव झाला होता. जयंत पाटील यांच्या भेटीदरम्यान विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar), बँकेचे विद्यमान चेअरमन भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले व इतर संचालक उपस्थित होते.

MLA Shivendrasinharaje Bhosale Met On Minister Jayant Patil At Satara District Bank bam92

loading image