esakal | तुकाराम ओंबळेंच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना, शिवेंद्रसिंहराजेंची मुश्रीफांवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Martyr Tukaram Omble

शहीद ओंबळे यांच्या पराक्रमामुळे जावली तालुक्यातील केडंबे गाव देशात प्रसिध्द झाले. ओंबळेंच्या पराक्रमाची दखल घेवून राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी केडंबे येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केलीय.

तुकाराम ओंबळेंच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : 26 नोव्हेंबरला मुंबईवर (26/11 Attack Mumbai) हल्ला करून शेकडो लोकांचे प्राण घेणाऱ्या शस्त्र सज्ज अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडताना हौतात्म्य आलेल्या तुकाराम ओंबळे (Martyr Tukaram Omble) यांचा पराकम आजही भारतीयांच्या हृदयात ठसून राहिला आहे. जावळीच्या या वीर सुपुत्राच्या केडंबे या मूळगावी उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाचा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लागावा, असे केडंबे ग्रामस्थांना व जावलीकरांना वाटते. शहीद ओंबळे यांच्या नियोजित स्मारकासाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत झाला असतानाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांच्या समवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत स्मारकासाठी ५ कोटी रूपयांच्या निधीची मागणी करणे हे हास्यास्पद असून शहीद ओंबळेंच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना करणारे आहे, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी व्यक्त केले. (MLA Shivendrasinhraje Bhosale Criticizes Minister Hasan Mushrif From The Memorial Of Martyr Tukaram Omble Satara Marathi News)

हुतात्मा ओंबळे यांच्या पराक्रमामुळे जावली तालुक्यातील केडंबे हे छोटेशे गाव देशात प्रसिध्द झाले. शहीद ओंबळेंच्या पराक्रमाची दखल घेवून राज्य सरकारने (Maharashtra Government) त्यांच्या जन्मगावी केडंबे येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. ओंबळेंचे स्मारक झाल्यास केडंबे गावचे महत्व वाढून त्यांचे स्मारक युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. स्मारक झाल्यास पर्यटनाच्या दृष्टीने अश्वासक वातावरण निर्माण होवून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. यासाठी ओंबळे यांच्या भव्य स्मारकाबरोबरच केडंबे गावास अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा व गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जास्ती-जास्त निधी देण्याची मागणी आपण वेळोवेळी शासनाकडे केलीय.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न

केडंबे गावातील स्मारकासाठीच्या जमीन हस्तांतरणाच्या कामात वास्तविक जिल्हा प्रशासनाने पुढे होत कागदपत्रांची पूर्तता करून स्मारकाच्या कामास गती देणे गरजेचे होते. मात्र, निव्वळ दप्तर दिरंगाईमुळेच स्मारकाचे काम गेली अनेक वर्षे रखडले. स्मारकाच्या निधीसाठी शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावाही केला असून यापूर्वी स्मारक निधी संदर्भात झालेल्या शासनाच्या बैठकीत शहीद ओंबळे यांच्या स्मारकासाठी व केडंबे गावच्या विकासाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तथापि, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत मुंबई येथे नुकत्याच बैठकीत स्मारकासाठी ५ कोटी रूपयांची मागणी करणे ही एकप्रकारे अवहेलना करण्याचाच प्रकार असल्याचेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.

MLA Shivendrasinhraje Bhosale Criticizes Minister Hasan Mushrif From The Memorial Of Martyr Tukaram Omble Satara Marathi News

loading image