esakal | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न; शेलार, शिवेंद्रसिंहराजेंत खलबत्तं
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न

शेलार हे सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात थांबून तेथील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : आगामी निवडणुकांच्या (upcoming elections) पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार (BJP leader ashish shelar) आज रविवार (ता. ११) साताऱ्याच्या दौऱ्यावर आले आहेत. सध्या ते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्या सुरुची बंगला येथे पोहचले असून या दोन बड्या नेत्यांत दीर्घकाळ चर्चा सुरू असून साताऱ्यात भाजपला भक्कम करण्यासाठी त्यांनी रणनीती आखली असल्याचे समजते.(BJP leader ashish shelar has arrived in satara to take stock of the upcoming elections on a district wise basis)

हेही वाचा: 'जरंडेश्वर'नंतर सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस

सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडी घडू लागलेल्या आहेत. जिल्ह्यात भाजपकडून पक्षवाढीसाठी देखील प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून चांगल्या प्रकारे काम केले जात आहे का? हे पाहत आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप पक्ष मजबुतीने उतरणार असल्याने त्यासाठी आखलेल्या व्युहरचनेचा आढावा घेण्यासाठी रविवारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सातारा येथे येऊन आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या सुरुची या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. शेलार हे सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात थांबून तेथील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसह नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेऊन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार असल्याचे समजते.

हेही वाचा: सातारा पालिकेतील टेंडर प्रक्रियेत 'गोलमाल'

सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्या जवळ आलेल्या आहेत. या संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारकडून विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, विरोधी असलेल्या भाजपने सध्या सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले असून जिल्ह्यात पक्ष वाढीस, बुथ कमिट्या सक्षम करण्याकडे लक्ष दिले आहे. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. त्यासाठी त्यांनी बुथबांधणी सुरू केली आहे. यामध्ये सक्षम कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.

हेही वाचा: हद्दवाढीमुळे सातारा पालिकेच्‍या तिजोरीवर ताण, निधीअभावी विकास रखडला!

साताऱ्यात भाजपने बुथनिहाय बांधणी सुरू केली आहे. सातारा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या भाजप आमदार आशिष शेलार यांच्याबरोबर भाजप अध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्यासह विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी व पदाधिकारीही आहेत.

loading image