'दहा मिनिटं रडायचं अन् पप्या घ्यायचं, आता बास करा'

Udayanraje Bhosale vs Shivendrasinharaje Bhosle
Udayanraje Bhosale vs Shivendrasinharaje Bhosleesakal
Summary

'निवडणुका जवळ येतील तसं ते पाया पडतील, गळ्यात पडतील परंतु हे सर्व तात्पुरतं आहे.'

सातारा : जसं-जशी निवडणूक जवळ येतेय, तसं-तशी साताऱ्यात चांगलीच रंगत वाढू लागलीय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सातारा नगरपालिकेच्या (Satara Municipality) इमारतीचं भूमिपूजन झालं चांगलं झालं. परंतु, त्या इमारतीचा प्रस्ताव नाही, बजेटमध्ये तरतूद नाही, कसलीही तांत्रिक मान्यता नाही. पण, नारळ फोडून, गाणी गावून लोकं मोकळी झाली. गाणी गाण्यापेक्षा आता तुम्ही सातारकरांना नेमकं सांगा, काय बाय सांगू कसं गं सांगू तुम्हाला नक्की कशाची लाज वाटली तेही सांगा, असं म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर जोरदार टीका करत चांगलीच खिल्ली उडवली.

Udayanraje Bhosale vs Shivendrasinharaje Bhosle
गोव्यात ममतांना धक्का; माजी आमदारांसह 5 नेत्यांनी सोडली TMC ची साथ

साताऱ्यातील गोडोली जकात नाका (Godoli Jakat Naka) ते अजंठा हॉटेल परिसरातील रहिवाशांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने नवीन पाण्याच्या पाइपलाइनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी चक्क शिवेंद्रराजे यांनी जेसीबी (JCB) चालवला. या कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे यांच्यासह अॅड. डी. जी. बनकर यांच्यासह नेत्यांचाही समाचार घेतलाय.

Udayanraje Bhosale vs Shivendrasinharaje Bhosle
भाजपच्या बड्या आमदारानं घेतली मनसे आमदाराची भेट

शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, दहा मिनिट रडायचं आणि पप्या घ्यायचं, आता त्यापेक्षा तुम्ही विकासकामे सांगा. निवडणुका जवळ येतील तसं ते पाया पडतील, गळ्यात पडतील परंतु हे सर्व तात्पुरतं आहे. गळ्यात पडण्याचं प्रेम हे मनापासून नाही, तर निवडणुकीपुरतेच आहे. लोकांनीही विकासकामं होतात की नाही ते पहावं. सातारा शहरातील हद्दवाढीचं काम आम्ही केलंय. केवळ निवडणुकीपुरतंच तुमच्यासमोर आलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com